dd

PM Kisan Yojana : e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही 10 वा हप्ता

 






पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता :-15 डिसेंबरपर्यंत जारी होणार आहे. तुम्हीही याची आतुरतेनं वाट पाहत असाल, तर लगेच e-KYC पूर्ण करा. कारण, सरकारनं या योजनेत महत्त्वपू
र्ण बदल केला आहे.

PM Kisan Yojana 

सरकारनं PM KISAN योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी e-KYC आधार अनिवार्य केलंय. पोर्टलवर आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. तसेच, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीनंही हे साध्य करू शकता.


  • यासाठी तुम्ही प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.

  • उजव्या बाजूला तुम्हाला टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या